कर्जत, दि.३१ मे २०२०: संपुर्ण देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने देशात ताळेबंदची घोषणा केली. गेली दोन अडीच महिने ताळेबंदी होती या वेळेची सर्व परिस्थिती कशी होती हे देशातील नागरिकांना पाहण्यास मिळत आहे.
ताळेबंदमुळे नागरिकांची कामे बंद झाली आहेत. त्यात गरीब गरजू लोकांना सध्य परिस्थिती मध्ये खाण्याचे वांदे होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थान प्रति शिर्डीचे सर्वेसर्वा प्रकाश देवळे माजी आमदार यांनी २०० गरजू नागरिकांना धान्य वाटप केले.
सविस्तर वृत्त असे की शनिवार (दि.३०) रोजी सिध्दटेक येथे ह.भ.प.सुखदेव महाराज ननवरे यांच्या अथक परिश्रमांतून गोर गरीब गरजू लोकांना शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या हस्ते २०० नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी देवळे यांनी सांगितले की, गरीब गरजू लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा मदत लागल्यास संपर्क साधावा. धान्य वाटप करताना देवळे यांच्या पत्नी तसेच त्यांचे स्वयंसेवक तसेच ह.भ.प.सुखदेव महाराज ननवरे, सुखदेव जाधव, जलालपूर गावचे उपसरपंच किसन कासारे, ग्रामपंचायत सदस्य बापू खुरंगे, ग्रामपंचायतीचे लेखणीक रघुनाथ ननवरे, सिद्धिविनायक मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष