नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे झाले आहे. असे असताना अनेक नेते मंडळीही कोरोनाच्या विळख्यात अडकत चालल्याचे चित्र समोर येत आहे.
त्यातच भाजपचे उत्तराखंडमधील कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा अहवाल येण्याच्या एक दिवस अगोदर सत्यपाल मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर हा अहवाल समोर आला आहे. सतपाल महाराज यांचे कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे संपूर्ण मंत्रीमंडळावर होम क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे एकाच खळबळ उडाली आहे.
अहवाल येण्या आधी सतपाल महाराज मंत्रिमंडळाच्या बैठकीला एक दिवस आधी उपस्थित होते. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. तसेच त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या १७ जणांहुन अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण मंत्रिमंडळाचा क्वारंटाइन करावे लागते की काय, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: