पुरंदर (जेजुरी), दि. २ जून २०२०: लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून सोशल वेबसाईट ॲपच्या किंवा एस एम एसच्या माध्यमातून अनेक प्रलोभने दाखवत नागरिकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जेजुरी पोलिसांच्यावतीने अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नका असे आवाहन करण्यात आले.
सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून उदारणार्थ फेसबुक, व्हाट्सअप, ओएलएक्स यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज देतो, गाडी देतो किंवा गाडी विकणे आहे अशा प्रकारच्या जाहिराती दिल्या जातात. त्यानंतर मोबाईल फोनवर लोन पाहिजे का? अशी विचारणा ही केली जाते. त्याचबरोबर अनेक लोकांकडून आपणास एखादी वस्तू बक्षीस मिळणार असून त्याचा जीएसटी भरावा लागेल म्हणून गुगल पे किंवा फोन पे यासारख्या माध्यमातून पैसे मागवून घेतले जात आहेत किंवा अनेक वेळा समोरच्या व्यक्तीचे एटीएम कार्ड बंद होणार असल्याचे सांगून माहिती घेऊन त्यांची फसवणूक केली जात आहे.
तरी नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका व त्यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. असे आवाहन जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे