पुलवामा मध्ये शोधमोहीम सुरूच, इंटरनेट सेवा बंद

जम्मू-काश्मीर, दि. ३ जून २०२० : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलाचे ऑपरेशन सुरू आहे. बुधवारी दक्षिण कश्मीर मधील पुलवामा येथे आतंकवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. यानंतर कंगन गावात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासह संपूर्ण परिसर घेरला गेला आहे. पुलवामामधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सुरक्षा दलाने दोन दहशतवादी ठार केले. अवंतीपोरा येथील सैमोह गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम राबविली. सैन्यांनी दहशतवाद्यांना शस्त्रे टाकण्यास सांगितले होते, परंतू दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

अनेक तासांच्या गोळीबारानंतर सुरक्षा दलाने दोन दहशतवादी ठार केले. त्यांच्याकडून सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त करण्यात आला. असे सांगितले जात होते की हे दोन्ही दहशतवादी अन्सार गजावत उल हिंद (एजीएच) या दहशतवादी संघटनेत काम करायचे. पुलवामा येथे सलग तिसर्‍या दिवशी चकमक झाली.

याआधी लष्कराने नियंत्रण रेषेत (एलओसी) घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत १३ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मेंढर सेक्टरमध्ये १० आणि नौशेरा सेक्टरमध्ये तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांकडून सैन्याने २ एके ४७, यूएस रायफल, चिनी पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा