मुंबई, दि. ३ जून २०२०: चक्रीवादळ निसर्गाने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात धडक दिली आहे. सुरवातीला वादळाने मुंबईतील अलिबाग किनारपट्टीला धडक दिली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार चक्रीवादळामध्ये सुमारे ताशी १२० किमी वेगाने वारे वाहत आहेत. मुंबईतील बहुतेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर काम थांबविण्यात आले असून वांद्रे-वरळी समुद्रमार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबई आणि गुजरातच्या बर्याच भागात रेड अलर्ट आहे.
अलिबाग मध्ये झाले लँड फॉल
निसर्ग चक्रीवादळाने अलिबाग मध्ये लँड फॉल झाले आहेत. हे वादळ येथे पोहोचताच अलिबाग मध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. हवामान खात्याच्या म्हणाण्यानुसार हे लँड फॉल संपण्यास आणखी ३ तासाचा वेळ लागू शकतो. जोरदार वारा आणि पाऊस यांच्या दरम्यान लोकांना घरातच राहण्याची सूचना केली जात आहे. त्याच वेळी, किनारपट्टी भागात जाण्यास प्रतिबंधित केले आहे.
वांद्रे-वरळी सी लिंकवर वाहतूक थांबवली
वादळाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे-वरळी समुद्रमार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. एनडीआरएफच्या २१ संघटना राज्यात किनारपट्टीवर तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत लोकांना घरातून बाहेर न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी











































.jpeg?updatedAt=1709014762936)
