कर्जत, दि. ४ जून २०२०: कर्जत तालुक्यातील वीजेचा लपंडाव न थांबल्यास कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा कर्जत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले यांनी कर्जत वीज कार्यलयास दिला आहे. कर्जत शहरात वीजेने लपंडाव सुरू केला असून गेली काही दिवस पाच ते दहा मिनिटे वीज येते पाच ते दहा मिनिटांनी परत जाते. असा लपंडाव पाहण्यास मिळत आहे. या सर्व वीजेच्या लपंडावामुळे कर्जत मधील व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. जे नागरिक घरीच असतात ते उकाड्याने त्रस्त झाले आहेत.
रात्री अपरात्री वीज खंडीत होत असल्याने अनेकांना झोपेच्या समस्या निर्माण होत आहेत. या सर्व कारणामुळे सर्व सामान्य नागरिक मात्र भलतेच त्रस्त झालेले पाहण्यास मिळत आहे .
अगोदरच कोरोनामुळे ताळेबंदची परिस्थिती आणि त्या मध्ये वीजेचे हे लपंडावाचे खेळणे. या परिस्थितीमुळे कर्जतकर चांगलेच तापले आहेत. वीजेवर चालणाऱ्या वस्तूंचे फार मोठे नुकसान होत आहे. वीजेचा प्रश्न तातडीने सुरळीत व्हावा अशी मागणी नागरिकांमधुन होत होती. यावर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले यांनी वीजेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अन्यथा वीज वितरण कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा घुले यांनी दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष