खोपोलीतील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरला कोरोनाची लागण

खोपोली, दि. ७ जून २०२०: खोपोलीतील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टर चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. डॉक्टरांच्या संपर्कात किती लोक आले आहेत याची माहिती घेतली जात असून डॉक्टरांना एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

शहरातील शास्त्रीनगर भागात याआधी एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच भागामध्ये आता एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या भागात खळबळ उडाली आहे. खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लक्षणे जाणवल्यानंतर सदर डॉक्टरला रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर डॉक्टर ज्या खाजगी रुग्णालयात काम करत होते त्या रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग सील करण्यात आला आहे.

या डॉक्टरांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर रुग्णालयाचा बाह्य विभाग बंद ठेवण्यात आला असला तरी रुग्णालयातील सर्व संबंधित कर्मचारी व डॉक्टरांना घरातच बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान कोरोना गेल्याच्या थाटात उत्सुकतेने मास्क न वापरता नियम न पाळणारे नागरिक आता तरी काळजी घेणार आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा