पुण्यात उद्यापासून बाजारपेठा सुरू ; पुस्तके खरेदीसाठी पालकांची होणार गर्दी?

पुणे, दि.७ जून २०२०: जून महिना आला की पालकांची व पाल्यांची गडबड सुरू होती ते नविन दफ्तर, शाळेचे गणवेश व पुस्तके खरेदी करण्यासाठी.आणि याच पार्श्वभुमीवर पुण्यातील अप्पा बळवंत चौकात दरवर्षी पालक व मुलांची गर्दी उसळती.परंतू सध्या कोरोनामुळे परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे पुण्यात उद्या( सोमवार) पासून बाजार पेठा उघडण्यास महापालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात आल्याने उद्या बाजारपेठेत पुस्तके खरेदीसाठी पालकांची गर्दी होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून बाजारपेठा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतू आता बाजारपेठा उघडण्यास सरकारने परवानगी दिली असल्याने आता हे पाहणे गरजेचे आहे की वरिल व्यसायाच्या दुकानदारांकडून पुस्तकांची पूर्तता केली जाणार का? बाजारपेठेत प्रत्येक इयत्तेची पुस्तके उपलब्ध आहेत का ? दुकानदार काय काळजी घेणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देखील उद्या दुकाने उघडल्यानंतरच मिळण्यास मदत होणार आहे.

दुकाने सुरू झाल्यानंतर
व्यापा-यांना प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच चालावे लागणार आहे. त्यामुळे या दुकानात गर्दी होणार की नागरिक स्वतः काळजी घेऊन सोशल डिस्टंसिंगची काळजी घेवून बाजारात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पुण्यात बऱ्याच दिवसानंतर बाजार पेठांमध्ये गर्दी होणार का हे पाहणे महत्वाचे असेल.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा