पुरंदर, दि.९ जून २०२० : बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर नाभिक समाजाबाबतील आक्षेपार्ह विधान करून समाजाची बदनामी केली आहे ,त्यामुळे राज्यातील नाभिक बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पुरंदर तालुका नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे याबतचे निवेदन पुरंदरचे नायब तहसीलदार उत्तम बढे व सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी एस हाके यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
बुलढाणा जिल्ह्यातील विवेक लांबे या माथेफिरू व्यक्तीने सोशल मीडियावर नाभिक समाज व समाजातील माहिलांबाबत अश्लील व गलिच्छ भाषेत बदनामी केली आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर व्यक्तीवर सायबर गुन्हा दाखल करून त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पुरंदर तालुका नाभिक महामंडळाने निवेदनाद्वारे केली आहे . पुरंदर तहसीलदार कार्यालय व सासवड पोलीस स्टेशन मध्ये हे निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे नेते नितीन राऊत,नवनाथ मोरे,संघटनेचे अध्यक्ष राहुल मगर पदाधिकारी भारत मोरे,सुशील गायकवाड, तुकाराम भागवत, सागर विभाड, मल्हार राऊत, सासवड शहर अध्यक्ष बंटी शिंदे, जेजुरी शहर अध्यक्ष विजय बापू राऊत, नीरा शहर अध्यक्ष माउली गायकवाड, तसेच सतीश गायकवाड, नंदकुमार गायकवाड, संदीप गायकवाड, वैभव शिंदे, बालाजी शिंदे, सचिन पवार आदी उपस्थित होते .
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे