उस्मानाबाद तालुक्यातील वानेवाडी गावास खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट

उस्मानाबाद, दि.१० जून २०२०: उस्मानाबाद तालुक्यातील वानेवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर गावास भेट देऊन प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांची पाहणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली.

शिवसेना पक्षामार्फत गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आर्सेनिक अल्बम-३० या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात आले. आयुष्य मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्यांचा वापर कसा करावा तसेच येणाऱ्या काळात कोरोनाबाधित रुग्णा प्रति कोणताही भेदभाव न ठेवता त्याला परत मूळ प्रवाहात आणण्यासाठी मानसिक आधार व बळ द्या.

वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क राहावे. तसेच ग्रामस्थांनी प्रशासना मार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, तालुका प्रमुख सतिषकुमार सोमाणी, सरपंच प्रतिभाताई सरवदे, पोलिस पाटील मनिषाताई घेवारे, उपसरपंच प्रमोद उंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेनकुदळे मॅडम, गणेश गाढवे, ज्ञानेश्वर जाधव, गणेश घेवारे, ग्रामसेवक, तलाठी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा