कदमवाकवस्ती, दि.१० जून २०२० : कदमवाकवस्ती येथे( दि. ९) रोजी ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजनांसाठी लागणारे साहित्य येथील ग्रामस्थांची अडचण ओळखून ग्रामस्थांना कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचे हेतूने हवेली तालुक्यातील कदमवाक वस्ती ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांना आरोग्य किट देण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझर, लॅबोसेप्टीक अाँटीसेप्टीक, सॅनिटरी पॅड, कापडी मास्क, मेडिमिक्स साबण, आर्सेनिक अल्बम गोळ्या सोडियम हायपोक्लोराईड एक लिटर व तसेच हवेली पंचायत समितीच्या विशेष निधीमधून पंचायत समितीचे सदस्य अनिल टिळेकर, यांच्या माध्यमातून कदमवाकवस्ती गावातील ११ अंगणवाड्यांना २१ पाणी फिल्टरचे वाटप करण्यात आले. या साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. व उर्वरित राहिलेल्या ग्रामस्थांना उद्यापासून वाटप करण्यात येईल, यावेळी वैद्यकीय अधिकारी, हवेलीचे डॉ. सचिन खरात, गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेलीचे प्रशांत शिर्के, ग्रामपंचायत कदम वाकवस्ती सरपंच गौरी गायकवाड, ग्रामसेवक प्रविण देसाई, हवेली पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, उपसरपंच बाबासाहेब काळभोर, चित्तरंजन गायकवाड, चंद्रदीप काळभोर, व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांना वाटप करण्यात आले. आशा वर्कर यांना आरोग्य किट विषयी माहिती देण्यात आली आहे.
आर्सेनिक अल्बम गोळ्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी कदमवाकवस्ती ग्रामस्थांना मोफत दिल्या. यावेळी बोलताना कदमवाकवस्ती गावच्या वतीने सरपंच गौरी गायकवाड यांनी प्रदीप कंद यांचे आभार मानले व आरोग्य किट ग्रामस्थांना घरोघरी जाऊन वाटप करण्यात येईल. मेडिकल किटचा वापर कसा करावा यासाठी दिलेल्या किट मध्ये माहितीपत्रक दिलेले आहे.
तरी दिलेल्या माहिती पत्रकानुसार नागरिकांनी त्या किटचा वापर करावा व काही अडचण आल्यास आशा वर्कर, व वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांना संपर्क करावा व कदमवाक वस्ती मधील सर्व नागरिकांनी कोरोनाच्या परस्थितीमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी घरी रहा सुरक्षित रहा व लक्षणे दिसून आल्यास त्वरित उपचार घ्या व आपली व आपल्या परिवाराची व गावची काळजी घ्या , असे सांगितले असल्याचे सरपंच गायकवाड यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे