अजय पंडिता यांच्या हत्येनंतर काश्मिर मधील सरपंचांमध्ये भीतीचे वातावरण

जम्मू काश्मिर, दि. १० जून २०२०: जम्मू काश्मिर मध्ये अनंतनाग या भागातील एका सरपंचाची आतंकवाद्यांनी हत्या केल्यापासून या भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कश्मिरी पंडित असलेल्या सरपंचाची हत्या झाल्यानंतर या भागातील इतर सरपंचांमध्ये देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हेच कारण आहे की ज्यामुळे काश्मिर मधील सरपंच व पंच काश्मिर सोडून जम्मूच्या दिशेने धाव घेत आहेत. जेणेकरून ते सुरक्षित राहू शकतील.

विशेष म्हणजे सोमवारी जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांनी सरपंच अजय पंडिता यांना गोळ्या घालून ठार मारले. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित संस्था ‘रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) ने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. अजय पंडिता हे काँग्रेस पक्षाशी सलग्न होते.

अजय पंडिता यांना दहशतवाद्यांनी त्यांच्या घरासमोरच गोळ्या घालून ठार मारले होते. रुग्णालयांमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या या सर्व प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत.

मागच्या काही दिवसांपासून दहशतवादी काश्मिरमध्ये आतंकवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते परंतू सैनिकांच्या कारवाईमुळे त्यांचे हे कारस्थान अपयशी झाले. परंतु ह्या वेळेस त्यांनी एका सरपंचाला लक्ष बनवले त्यामुळे यावेळेस ते त्यांच्या कारस्थानामध्ये यशस्वी झाले. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दले आणि अतिरेकी यांच्यात वारंवार चकमकी होत असून गेल्या दोन-तीन दिवसात डझनहून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत.

अजय पंडिता हे काँग्रेस पक्षाशी सलग्न होते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून त्यांच्या हत्येबद्दल दुःख व्यक्त केले. राहुल गांधींनी लिहिले की काश्मिरमध्ये लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी अजय पंडितांनी आपले प्राण दिले. मी शोकाच्या या घटनेत त्याच्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह उभा आहे.

तसेच, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, अजय पंडितांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांची हत्या काश्मिरातील वेगवेगळ्या विभागातील लोकांमध्ये भीती व द्वेष निर्माण करण्याचा कट आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा