तिरुअनंतपुरमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार उल्हासनगरच्या प्रांजल पाटील यांनी स्वीकारला
वयाच्या ८ व्या वर्षी त्यांची दृष्टी कायमची गेली. दादरच्या कमलाबाई मेहता शाळा तसेच सेंट झेविअर्स कॉलेज मध्ये त्यांचा शिक्षण झालं.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी एम . ए एम फिल आणि पी एच .डी चा प्रबंध पूर्ण केला. शिक्षण सुरु असतानाच त्यांनी नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरु केला . रेल्वे सर्व्हिस साठी त्यांची निवडही झाली होती पण रेल्वेने त्यांना सुरवातीस रुजू करून घेण्यास नकार दिला.
हे सगळं सुरु असताना आय ए एस साठी त्यांची निवड झाली आणि त्यांना १२४ वी रँक मिळाली. सध्या त्या केरळ केडर मध्ये आहेत. त्यांच्या या कार्याला विविध स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.