कर्जत, दि.१२.जून २०२०: कर्जत तालुक्यातील खाडवी येथील वन विभागाच्या गट नंबर २३३ मध्ये खाजगी व्यक्तीने केलेले अतिक्रमण वरिष्ठ अधिकारी कल्याण साबळे यांच्या निर्देशनाखाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन विभागात केलेले अतिक्रमण काढून टाकले आहे. यावेळी खाडवीचे पोलिस पाटील आणि काही गावातील नागरिक हे देखील उपस्थित होते.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की, कर्जत तालुक्यात वन विभागाचे मोठे क्षेत्र आहे. या मधील रवळगाव येथील २३३ नंबर मध्ये एका खाजगी व्यक्तीने वन विभागाच्या हद्दीत अतिक्रमण केले होते.
या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने पत्र्याने घर उभारणी देखील केली होती. या विषयावर वन विभागाकडे अनेक तक्रारी आलेल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कल्याण साबळे यांनी वन विभागाच्या कर्मचारी वर्गास त्या ठिकाणी पाठवून वन क्षेत्रात केलेले अतिक्रमण दुर केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष