सीमेवर परिस्थिती नियंत्रणात, नेपाळशिही संबंध चांगले: एम.एम. नरवणे

देहरादून, दि. १३ जून २०२०: भारताचे लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे म्हणाले आहेत की चीन सीमेवरची परिस्थिती नियंत्रणात आहे. ते म्हणाले की, चीन आणि भारत यांच्यात सैन्य पातळीवर अनेक स्तरांचे संवाद आहेत आणि वाटाघाटीच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रकारचे विवादित प्रश्न सोडविण्यास सक्षम आहोत.

परिस्थिती नियंत्रणात आहे                                                                                                लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे म्हणाले की, मी देशवासीयांना विश्वासात घेऊन सांगतो की चीन सीमेवरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. त्यांनी पुढे म्हणाले की सीमा विवादावरून चीन सोबत दोन्ही सैन्यांमध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत. या चर्चा कमांडर स्तरीय होत्या. कमांडर स्तरीय चर्चांमध्ये अनेक सत्र पार पडले ज्यामध्ये सीमा विवादावरून वाटाघाटी करण्यात आल्या व विवाद संपवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले.

लष्करप्रमुख म्हणाले की या चर्चेनंतर दोन्ही बाजूंनी माघार घेतली आहे आणि आम्हाला आशा आहे की सतत होत असलेल्या चर्चेतून भारत आणि चीनमधील जे काही वाद सीमारेषावर चालू आहेत ते सोडवण्यात येतील आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहोत.

शुक्रवारी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये गलवान क्षेत्राबाबत चर्चा झाली. मेजर जनरल लेव्हलच्या या संभाषणात गल्वान प्रदेशातील तणाव कमी करण्यावर चर्चा झाली. भारत आणि चीन यांच्यातील वार्तालाप ६ जूनपासून सुरू झाला तेव्हा दोन्ही कोर्प्स कमांडर भेटले होते. भारताच्या वतीने त्याचे नेतृत्व लेफ्टनेंट हरिंदर सिंग यांनी केले. तर मेजर जनरल लियू लिन चीनच्या वतीने चर्चेत सहभागी होते.

या संवादानंतर गलवान प्रदेशातील दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घेतली. शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस बिपिन रावत आणि तिन्ही सैन्यांच्या प्रमुखांशी बैठक घेतली आणि सीमेवरील परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला.

नेपाळशी मजबूत संबंध                                                                                                        लष्कर प्रमुख नरवणे म्हणाले की, नेपाळशी आपले चांगले संबंध आहेत. नेपाळशी आपले भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. एवढेच नव्हे तर दोन्ही देशांमधील लोकांशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते म्हणाले की यापूर्वीही नेपाळ सोबत आपले संबंध चांगले होते आणि यापुढे ही ते तसेच राहतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा