गोदावरी नदीत मेलेल्या माशांचा खच

9

नांदेड, दि.१३ जून २०२०: नांदेड शहरामधून वाहणाऱ्या  गोदावरी नदीच्या काठावर मृत माशांचा खच पडल्याचे पहायला मिळत आहे. या मेलेल्या माशांमुळे परिसरात असणाऱ्या गावात दुर्गंधी पसरली आहे. या मेलेल्या माशांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे.

एवढे मासे मरण्याचे नेमके कारण अजून समजले नसले तरी शहरातील सर्व सांडपाणी नदीत जात असल्याने हे मासे त्या दुषित पाण्यामुळे मरण पावले असल्याचे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या परिसरातील एका कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडल्यानेही हे मासे मरण पावले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या माशांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, याचा महापालिका प्रशासनाने शोध घेऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी पर्यवरण प्रेमींनी केली आहे. पालिका प्रशासनाने नदीला प्रदूषण मुक्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी