दावडी येथील स्वस्त धान्य दुकानावर कारवाई

राजगुरूनगर, दि.१३ जून २०२० : खेड तालुक्यातील दावडी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. नागरिकांना रेशनिंग कमी देणे ,धान्य देताना जादा दर आकारणे , पावती न देणे , रेशनिंगकार्ड असूनही धान्य न देणे , याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज आल्याने पंचनामा करून हा आदेश देण्यात आला

दावडी येथील स्वस्त धान्य दुकानात कोरोनाच्या अडचणीत दुकानातून योग्य धान्य वाटप केला जात नसल्याचा लेखी अर्ज वारंवार करूनही तालुका पुरवठा अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही. म्हणून याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दिल्यानंतर त्यांनी तालुका पुरवठा अधिकारी यांना पहाणी करून याचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे सादर केल्या नंतर ही कारवाई करण्यात आली . नागरिकांना रेशनिंग मिळावे यासाठी लगतच्या स्वस्त धान्य दुकानात शिधा पत्रिका जोडून देण्याचे ही आदेश देण्यात आले आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य नागरिकांना योग्य आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियमात देण्यात यावे अशा सूचना असताना ही दावडी येथील महालक्ष्मी महिला बचत गट या स्वस्त धान्य दुकानातून नागरिकांना देण्यात येणारे रेशन कमी देणे ,पावती न देणे , अनेकांना रेशन मिळतच नाही अशी तक्रार दावडी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम बढे व इतर यांनी तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी करूनही कोणती कारवाई होत नव्हती यानंतर त्यांनी याबाबतीत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केल्यानंतर या रेशनिंग दुकानाची पहाणी करण्यात आली प्रत्यक्ष वाटलं केलेले धान्य आणि शिल्लक राहिलेले धान्य याबाबत तफावत आढळून आली. त्याचसोबत गावातील नागरिकांचे जबाब घेऊन त्यांना ही योग्य धान्य मिळत नसल्याचे माहिती मिळाली .याबाबतचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला त्या अनुषंगाने या स्वस्त धान्य दुकावर ही कारवाई करण्यात आली

दावडी येथील हे स्वस्त धान्य दुकान महालक्ष्मी महिला बचत गटाच्या नावाने असून प्रत्यक्षात हे स्वस्त धान्य दुकान बचत गटाच्या नावाखाली दुसरीच व्यक्ती चालवत आल्याची बाब ही या तक्रारी अर्जात बढे यांनी केली होती , गेले कित्येक वर्ष नागरिकांना हक्काचे रेशन मिळत नाही , पावती दिली जात नाही , अनेकांना तर धान्यच दिले जात नाही अशा तक्रारी केल्यानंतर या दुकान चालकाने दि.१ जून रोजी तुकाराम बढे व पत्नी यांच्यावर हल्ला करून वाहनांची तोडफोड केली होती याबाबत त्यांनी खेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार ही दिली आहे .

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार रेशनिंग वाटपामध्ये तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

सुचित्रा आमले पाटील
तहसीलदार खेड

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा