पुण्यातल्या पासोड्या विठोबा मंदिराची दानपेटी फोडली

पुणे, दि.१४ जून २०२०: पुण्यातील प्रसिद्ध पासोड्या विठोबा मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व मंदिरे नागरिकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. त्यात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

बुधवार पेठेत असणाऱ्या पासोड्या विठोबा मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून पहिल्या मजल्यावरून घुसून ही चोरी केली असल्यचे कळून आले आहे .

मंदिराच्या दानपेट्या चोरट्यांनी फोडून त्यातला ऐवज लंपास केला आहे. पुजारी सकाळी पूजा करण्यासाठी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. घटना समजताच पोलीस देखील दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी याबाबत सूत्रे हलवून चोरांना पकडण्यासाठी सूचना केल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा