मुंबई, दि.१४ जून २०२०: तब्बल ८६ दिवसांनंतर मुंबई लोकलची सोमवारपासून फक्त आत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामगारांसाठी धावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतत ही मागणी लावून धरल्यामुळे रविवारी होणार्या राज्य सरकार आणि रेल्वे अधिकार्यांच्या बैठकीत मुंबई लोकलला कर्मचार्यांपुरता का होईना हिरवा झेंडा दाखवला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवेच्या कर्मचारी कामगारांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. केंद्राने आधी नकार घंटा वाजवली. मात्र आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सारेच निर्बंध शिथील होत असताना रेल्वे मंत्रालय ही मागणी मान्य करण्यास तयार झाले आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क आधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की आद्याप लोकल चालविण्याबाबत कोणतेही आदेश-निर्देश रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले नाहीत. मात्र रविवारी होणार्या बैठकीत यासंदर्भात आंतिम निर्णय होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
प्रवास नेहमीसारखा नसेल
या अत्यावश्यक सेवेच्या लोकल फक्त जलद मार्गावर पॉईण्ट टु पाईण्ट धावतील. प्रवाशांना रेल्वेकडून कोणतेही तिकिट देण्यात येणार नाही.राज्य सरकार कामगार-कर्मचार्यांची यादी रेल्वेला देईल आणि सर्व तिकिटे राज्य सरकारकडे येतील. या तिकिटांचे आगाऊ पैसे राज्य सरकार रेल्वेला देईल.
प्रवास करणार्या कर्मचारी कामगारांना राज्य सरकारत क्यु आर कोड असलेलेे आयकार्ड देईल. हा कोड स्कॅन करूनच लोकलमध्ये प्रवेश मिळेल.गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार कार्यालयीन वेळा ठरवेल. कामगारांचे तिकिट,थर्मल तपासणीचे जबाबदारी राज्य सरकारची असेल अशी माहिती समोर येत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: