कोल्हापूर, १५ जून २०२० :
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा जलतरणपटू वीरधवल खाडेने आज अपली चिंता बोलून दाखवली , तो म्हणाला की, ” जर जलतरण तलाव सुरू करण्यास आणखी विलंब झाला तर कारकीर्द धोक्यात येईल.”
वीरधवल खाडे पुढे हेही म्हणाला की, जे खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र आहेत अशा जलतरणपटूंसाठी जलतरण तलाव सुरू करावा तो म्हणाला पुढे असे ही म्हणाला की मी ऑलिम्पिकनंतर निवृत्त होईन,
सध्या कोरोनामुळे प्रशिक्षणासाठी स्विमिंग पूल सुरू करता येत नाही.त्यामुळे जलतरणपटूंना सराव करता येत नाही.
परंतू लॉकडाऊन मध्ये थोडी शिथीलता दिल्यामुळे , अनेक ऑलिम्पिक क्रीडा खेळाडूंनी प्रशिक्षण सुरू केले आहे, परंतू भारतीय जलतरणपटूंना अद्याप प्रशिक्षणाची परवानगी नाही.
२०१० च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा वीरधवल खाडे यामुळे नाराज असल्याचे दिसते आहे. तो पुढे असा ही म्हणाला की, “मी आजपासून सराव सुरू केला तरी माझी मागील कामगिरी मिळविण्यासाठी मला किमान ८ महिने लागतील . तीन महिन्यांपासून जलतरण तलाव बंद झाल्यामुळे मला सराव करता आला नाही. अशा परिस्थितीत मला शून्यापासून सुरुवात करावी लागेल. ” त्याच वेळी, कुस्ती, बॉक्सिंगसारख्या खेळांमध्ये आपण शारीरिक व्यायाम करू शकता. याचा फायदा खेळाडूंना मिळतो, परंतु शारीरिक कामामुळे पोहण्यात फारसा फरक पडणार नाही. आपण तलावामध्ये ६ – ७ तासांचा सराव केला पाहिजे.
न्यूज अनकट प्रतिनिधी