मुंबई, दि.१५ जून २०२० : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर ( वय ७८) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी माधव पाटणकर यांच्या निधनाबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, अशी भावना व्यक्त केली.
न्युज अनकट प्रतिनिधी: