शोपियांमध्ये सुरक्षा दलाचे मोठे यश, चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर, दि. १६ जून २०२० : शोपियानमध्ये लपून बसलेले ३ दहशतवादी काल सर्च ऑपरेशनमध्ये ठार झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील तुर्कवनाग भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना प्रथम त्यांच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर त्यांना ठार केले. दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

ही माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने त्या भागात शोध मोहीम राबविली ज्यामध्ये तिन्ही दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य करत अनेक राऊंड फायर केले. अद्याप दहशतवाद्यांची ओळख पटलेली नाही. दहशतवादी आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या या चकमकीचा पूर्ण आढावा येणे अजून बाकी आहे.

जम्मू-काश्मिरीमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध सातत्याने शोध मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे आता दहशतवाद्यांना खोऱ्यामध्ये थारा मिळणार नाही. यापूर्वी शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा आणि कुलगाम येथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाली. यावेळी सुरक्षा दलाने दोन अतिरेकी ठार केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा