पाटणा, दि. १६ जून २०२०: अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाने कुटुंब, चाहते आणि बॉलिवूड हैराण झाले आहेत. सुशांतच्या आत्महत्येचा धक्का त्याची चुलत वहिनी (लांबची नातेवाईक) सहन करू शकली नाही आणि सोमवारी त्यांचे निधन झाले. सोमवारी दिर सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त मिळाल्यानंतर बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील गावात राहणारी वहिनी सुधा देवी यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पूर्णिया जिल्ह्यातील मालडीहा हे सुशांतसिंग राजपूत याचे मूळ गाव. सुशांतच्या आत्महत्येची बातमी गावात पोहोचताच त्याची चुलत वहिनी सुधा देवी यांना धक्का बसला आणि त्याही डिप्रेशनला बळी पडल्या. त्यांनी खाणेपिणे बंद केले होते. एका बाजूला मुंबई मध्ये सुशांत सिंग वर अंत्यसंस्कार करण्यात येत होते तर त्याच्या गावातून त्याच्या वहिनीच्या मृत्यूची बातमी बाहेर आली.
सोमवारी सायंकाळी निधन झाले
जवळच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सुशांतसिंग राजपूत यांचे अंत्यसंस्कार मुंबईत होत असताना त्याचवेळी सुधा देवी यांचा मृत्यू झाला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर आता वहिनीच्या निधनानंतर कुटुंबा वर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी