निवडणूकीत व्यस्त असलेल्या शिक्षकांना आज (२१ ऑक्टोबर) मतदानाच्या दिवशी उशीर झाल्यास मतदानाच्या
दिवशी कामावर उशीरा येण्याची सूट जिल्हा अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी
परिपत्रकाद्वारे दिली आहे.या परिपत्रकामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगरात निवडणुकीचे काम करणाऱ्या शिक्षकांना कामानिमित्त उशीर होऊ शकतो,किंवा दुसरा दिवसही उजाडू शकतो त्यामुळे उशीर झाल्यास त्यांना उद्याच्या दिवशी कामावर उशीरा येण्याची सूट
देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक शिक्षक मध्यरात्रीपर्यंत तर काही शिक्षक पहाटे पर्यंत काम करत होते
आणि त्यानंतर त्यांना परत शाळेत कामावर यावं लागले. त्यामुळे एकप्रकारे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
त्यामुळेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेने पाठपुरावा केल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी यांनी खबरदारी घेऊन हे
शिक्षकांना दिलासा दिला आहे.