सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड

न्यूयॉर्क, दि. १८ जून २०२०: ८ व्या वेळी भारत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा (यूएनएससी) तात्पुरता सदस्य म्हणून निवडला गेला आहे. १९२ मतांपैकी १८४ मते भारताच्या बाजूने पडली. ही माहिती देताना संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. त्रिमूर्ती यांनी लिहिले की ‘सदस्य देशांनी भारताला जबरदस्त पाठिंबा दर्शविला आहे आणि सन २०२१-२२ साठी UNSC चा तात्पुरता सदस्य म्हणून भारताला निवडले आहे. भारताला १९२ पैकी १८४ मते मिळाली आहेत.’

तात्पुरता सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी भारताला केवळ १२८ मतांची आवश्यकता होती. तथापि, भारताला आधीपासूनच आशा होती की भारत बुधवारी सुरक्षा परिषद निवडणूक सहज जिंकू शकेल, ज्यामुळे भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०२१-२२ या टर्मसाठी अस्थायी सदस्य म्हणून निवडून आला आहे.भारत प्रथम १९५० मध्ये कायमस्वरुपी सदस्य म्हणून निवडला गेला आणि आज आठव्या वेळी. २०२१-२२ या कालावधीत आशिया-पॅसिफिक प्रवर्गातून अस्थायी जागेसाठी भारत एकमेव उमेदवार होता.

कोरोना साथीच्या आजारामुळे युएनचे मुख्यालय १५ मार्चपासून बंद होते. आज येथे तीन निवडणुका झाल्या. सर्व सदस्य राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या पुढील अध्यक्षांच्या, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या पाच गैर-स्थायी देशांच्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान केले.

यासह, भारत संयुक्त राष्ट्राच्या शक्तिशाली १५ सदस्यांच्या सुरक्षा परिषदेत गैर-स्थायी सदस्य म्हणून सामील झाला आहे.

या आधी २०११ मध्ये भारताची निवड

प्रादेशिक तत्वावर १० अस्थायी जागा वाटप केल्या जातात ज्यामध्ये आफ्रिकन आणि आशियाई देशांसाठी ५, पूर्व युरोपियन देशांसाठी १ , लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन देशांसाठी २, आणि पश्चिम युरोपियन आणि अन्य देशांसाठी २ जागा निश्चित केल्या आहेत.

कौन्सिलवर निवडून येण्यासाठी, उमेदवारांना महासभेत उपस्थित असलेल्या आणि सदस्य असलेल्या देशांच्या मतदानापैकी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असते.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. त्रिमूर्ती यांचे म्हणणे आहे की सुरक्षा परिषदेत भारताची उपस्थिती जगातील वसुधैव कुटुंबकमाविषयीची धारणा बळकट करेल.

यापूर्वी भारत १९५०–१९५१, १९६७–१९६८, १९७२–१९७३, १९७७–१९७८, १९८४–१९८५, १९९१–१९८२ आणि अलीकडे २०११-२०१२ मध्ये सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा