पुरंदर, दि. १७ जून २०२० : जेजुरी उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष, जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक उद्योजक रवींद्र जोशी यांना यंदाचा कै. दिनकरराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असल्याचे प्रतिष्ठानचे सचिव संजय सावंत यांनी सांगितले आहे .
जेजुरी उद्योजक संघाचे कार्यध्यक्ष असणारे रवींद्र जोशी यांनी संघटनेच्या माध्यमातून उद्योजक व कामगारांचे प्रश्न शासन दरबारी सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. जेजुरी शहरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. संत सोपान काका बँकेचे सल्लागार, केबीसीचे पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. जेजुरी औद्योगिक वसाहतीतील प्रेसियस इलेक्ट्रो फ्लाक या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. मरकळ आद्योगिक वसाहतीने यापूर्वी आदर्श उद्योजक पुरस्काराने जोशी यांना गौरविले होते.
सामाजिक, धार्मिक, औद्योगिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रवींद्र जोशी यांना यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर तसेच प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अलका यादव यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे