आजचे राशी भविष्य

मेष : शुभ रंग : पांढरा | अंक : ४ ज्यात कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. आज दैनंदीन कामातही अडथळ्यांची शर्यत असेल. गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.


वृषभ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५ कुणी आज पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाले म्हणून लगेच तुम्ही लढायला जावू नका. आज स्वत:च्या मर्यादा ओळखून वागणेच तुमच्या हिताचे असेल.


मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : २ जोडीदाराच्या खंबीर साथीने कोणत्याही अडचणी सहजच सुटतील. प्रवासास निघाला असाल तर मात्र आज थोडासा खोळंबा होण्याची शक्यता आहे.


कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १ तब्येतीच्या क्षुल्लक तक्रारींकडेही दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्याचप्रमाणे आज कोणतेही निर्णय उतावीळपणे घेऊ नका. मंगलकार्याची बोलणी उद्यावरच ढकला.


सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६ कवींना रोमँन्टीक काव्य सुचतील. गृहीणी आज पार्लर्ससाठी आवर्जुन वेळ काढतील. बऱ्याच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल.


कन्या : शुभ रंग : मरून| अंक : ४ बिल्डर्स, कंत्राटदार व दलाल यांच्यासाठी अनुकूल दिवस. जागेच्या खरेदीसाठी कर्जमंजूरी होईल. आज ज्येष्ठ मंडळींना दम्याचे विकार त्रस्त करतील.


तूळ : शुभ रंग : क्रिम| अंक : ७ नोकरीत कंटाळवाणी कामे करावी लागतील. हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह होईल. काही कारणांसाठी मातोश्रींची नाराजी पत्करावी लागेल.


वृश्चिक : शुभ रंग : पिवळा| अंक : ३ कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. आज आर्थिक बाजूही चांगली असेल. अती स्पष्ट बोलून आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे.


धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९ रिकाम्या चर्चेून वादविवाद होतील. आज वैवाहिक जिवनात जोडीदाराचे वर्चस्व मान्य करणे हिताचे राहील. व्यवसायात भागिदारांना विश्वासात घ्यावे लागेल.


मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : २ काही आवाक्या बाहेरचे खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. जमाखर्चाचे बजेट विस्कळीत होईल. घरात थोरांशी मतभेद होतील. त्यांच्या वयाचा मान राखाल.


कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : १ व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला लाभ पदरात पडेल. दूरावलेले आप्तस्वकिय जवळ येतील. मनोकामना पूर्ण होतील.


मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८ ध्येयप्राप्तीसाठी थोडी सकारात्मकता वाढवावी लागेल. कामाचे तासही वाढवावे लगतील. सुसंवादाने प्रश्न सोपे होतील. गृहीणींनी क्षुल्लक गोष्टी विसरुन जाणे हिताचे.

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा