नवी दिल्ली दि.१९ जुन २०२०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर आत्तापर्यंत खेळल्या ५,०९९ खेळाडूंपैकी ३,२४४ एवढे खेळाडू किमान एकदा तरी शून्यावर बाद झाले आहेत.
‘गोल्डन डक’ म्हणजे काय? : जेव्हा खेळाडू शून्यावर बाद होतो त्याला डक म्हटले जाते. पण या डक शब्दाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. पहिल्याच चेंडूवर खेळाडू बाद झाला तर त्याला ‘गोल्डन डक’ असे म्हटले जाते.
जगात असे काही खेळाडू आहेत जे १० किंवा त्यापेक्षा अधिक वेळा गोल्डन डकवर बाद झाले आहेत. त्यांबाबत आज माहिती पाहुयात..
१. लसिथ मलिंगा : १४ वेळा
२. शाहिद आफ्रिदी : १२ वेळा
३. मुथय्या मुरलीधरन : ११ वेळा
४. जवागल श्रीनाथ : ११ वेळा
५. मोईन खान : ११ वेळा
६. वासिम आक्रम : १० वेळा
७. चामिंडा वास : ९ वेळा
८. सनथ जयसुर्या : ९ वेळा
९. डॅरेन पॉवेल : ८ वेळा
१०. वकार युनुस : ८ वेळा