रेन्यू निदान वापरशाळेचे सजावट ठाकरे होस्टल उद्घाटन

सिंधुदुर्ग, दि. १९ जून २०२०: सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात ३ कोटी २१ लाख ८३ हजार रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत रेण्वीय निदान (मॉलिक्युलर) प्रयोगशाळा व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री उदय सामंत सहभागी झाले होते.

अद्ययावत प्रयोगशाळांच्या उभारणीमुळे सिंधुदुर्गच्या आरोग्य सुविधेत वाढ झाली आहे. या प्रयोगशाळेचा कोविड -१९ चाचणीबरोबरच माकडताप व इतर रोगांच्या चाचण्यांचा जिल्हावासियांना लाभ होणार आहे. सिंधुदुर्गसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अत्याधुनिक रुग्णालयाची मागणी देखील पूर्ण करु असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

तळकोकणामध्ये एखादा रोग उद्भवल्यास उपचारासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यात अथवा गोवा किंवा अधिक गंभीर स्थिती असेल तर मुंबईत जावे लागत असे, अशी परिस्थिती आजपर्यंत होती. आरोग्य सुविधांत वाढ केल्यामुळे ही परिस्थिती आता बदलेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईत २००७ मध्ये कस्तुरबा रुग्णालयात पहिली मॉलिक्युलर लॅब, त्यानंतर पुणे येथे दुसरी लॅब झाली. आज राज्यात अशा शंभर लॅब कार्यरत आहेत. कोरोना सोबत जगताना त्याचे निदान लवकरात लवकर होऊन त्यावर औषधोपचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा लॅब प्रत्येक जिल्हा, शहर आणि तालुक्यात असली पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा