मध्य प्रदेश, दि. १९ जून २०२०: मध्य प्रदेशात झालेल्या राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेसने एक जागा जिंकली आहे, तर भारतीय जनता पक्षाने दोन जागा जिंकल्या आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमधून राज्यसभेची निवडणुक जिंकली आहे.
मध्य प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन जागा जिंकल्या आहेत. त्यापैकी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही राज्यसभेची निवडणूक जिंकली आहे. या व्यतिरिक्त भाजपकडून सुमेरसिंग सोलंकी यांनीही निवडणूक जिंकली आहे.
त्याचबरोबर कॉंग्रेसच्या खात्यात मध्य प्रदेशातून राज्यसभेची एक जागा आली आहे. कॉंग्रेसच्या वतीने दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेच्या निवडणुक जिंकली आहे. मध्य प्रदेशमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी मतदान झाले. येथे एकूण चार उमेदवार रिंगणात होते. भाजप आणि कॉंग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी