स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई

अहमदनगर, दि. १९ जून २०२०: अहमदनगर शहरातील कल्याण रोडवरील नेप्ती नाका नालेगाव या ठिकाणी १५ लाख ४४ हजार ८२० रुपयांची विदेशी दारुची वाहतूक करणारा पिकअप गाडी पकडण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. नरेंद्र राजेंद्रसिंग रौतेला (वय ४०, रा.घर नं.२०४ प्रेमनगर, माजरा बायपास लहान, डेहराडून, उत्तराखंड), चालक बबन भाऊसाहेब काकडे (वय ३५, रा.गोरेगाव ता.पारनेर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार भाळवणीकडून कल्याण रोडने अहदनगर शहराच्या मार्गी सफेद रंगाचा महेंद्र पिकअप (एमएच १६, एई ११८१) हा विदेशी दारुचे बॉक्स घेऊन येत आहे.

पिकअप गाडीच्या पुढे सफेद रंगाची स्कार्पिओ ( एमएच १६, बीएच १९१९) या गाडीतून दारू घेऊन जाणारा मालक येत आहे. अशी पक्की खबर स्था.गु.शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार स्था.गु शाखेच्या पथकाने नेप्ती नाका, नालेगाव या ठिकाणी सापळा लावून मुद्देमालासह दारू वाहुन नेणार्‍या दोघांना पंचासमक्ष पकडण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेकुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पो.नि.दिलीप पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोना संदिप कर्डीले, पोकाँ रणजित जाधव, शिवाजी ढाकणे, आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा