सातारा जिल्ह्यात ईव्हीएम घोटाळा उघड
खटाव तालुक्यातील नवलेवाडी मतदान केंद्रातील प्रकार; तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी बदलले मशीन
सातारा : कोरेगाव मतदार संघातील खटाव तालुक्याच्या नवलेवाडी गावातील मतदान केंद्रावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या केंद्रावर मतदान करताना इव्हिएम मशीनचे कोणतेही बटन दाबले तरी मत कमळाला (भाजप) लाच जात असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामस्थांच्या तक्रातीनंतर इव्हिएम मशीन बदललं गेलं. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ईव्हीएम घोटाळा उघड झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु झाली आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, नागरिक ज्यावेळी या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येत होते. त्यावेळी कोणत्याही चिन्हा समोरील बटन दाबले तरी मत भाजपालच जात होते. याबाबत नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर मशील बदलण्यात आले. या घटनेबाबत काहीजण उठाव करण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी त्यांना मतदान केंद्र परिसरातून दूर नेल्यामुळे मोठी घटना घडली नाही. मशीन बदलेपर्यंत जवळपास २९०पर्यंत मतदान झाले होते. परंतु मशीन बदलले जरी असले तरी हे अगोदर झालेले २९० मतदानाबाबत शंका व्यक्त व्यक्त केली जात आहे. याबाबत येथे असणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट मान्य केली की, ज्यावेळी नागरिक घड्याळाला मतदान केले तरी ते कमळालाच जात होते.