अमेरिका २१ जून २०२० : रीडिंगमधील एका पार्क मध्ये एका व्यक्तिने वार केल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी तीन जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी या हल्ल्याला दहशतवादी घटना म्हणून घोषित केले आहे. एका वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार हल्लेखोराचे नाव खैरी सद्दल्लाह असल्याचे म्हटले जाते.
पोलिस घटनास्थळी पोहचले असून वरिष्ठ अधिकारी तपास करत आहेत यावेळी या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या हल्ल्याबद्दल आतापर्यंत मिळालेली माहिती.
सदर घटना केव्हा आणि कोठे घडले?
शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळील शहराच्या मुख्य मध्यवर्ती पार्क फोर्बरी गार्डनमध्ये हा हल्ला झाला. रीडिंगच्या ऐतिहासिक अॅबी अवशेषांच्या पुढे फोर्बरी गार्डन आहे, जिथे राजा हेनरी प्रथम यांचे दफन करण्यात आले आहे.
किती लोकांवर हल्ला झाला?
या हल्ल्यामध्ये चाकूने वार करून तीन जणांचा मृत्यू झाला असून आणखी तीन गंभीर जखमी झाले आहेत.
तिथे काही संशयित आहेत का?
सदर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरून पोलिस अधिका-यांनी एका २५ वर्षीय व्यक्तीला अटक केली.सदर व्यक्तीचे नाव खैरी सद्दल्लाह असे असल्याचे समजते. हा मनुष्य मूळचा लिबियातील असल्याचे , एका सुरक्षा स्रोताने तिथल्या एका वृत्तसंस्थेला सांगितले.
टेम्स व्हॅलीचे पोलिस याचा शोध घेत असून , पोलिस अधीक्षक इयान हंटर म्हणाले, “आम्ही एकाला अटक केली आहे आणि या घटनेसंदर्भात आम्ही इतर कोणत्याही लोकांचा शोध घेत नाही आहोत.”
“जनतेस यापुढे कोणताही धोका होणार नाही परंतू आम्ही कायम सतर्क राहू व जनतेनेही पोलिसांना बोलवून कोणी संशयास्पद व्यक्ती असल्यास तशी कल्पना आम्हाला द्यावी असे आम्ही आव्हान करतो.”
न्यूज अनकट प्रतिनिधी