शहिद कर्नल संतोष बाबू यांच्या कुटुंबास तेलंगणा सरकार कडून मदत

तेलंगणा, २२ जून २०२० : चीन विरूद्ध झालेल्या रक्तरंजित झटापटीत चीन सीमेवरील बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर (CO) कर्नल संतोष बाबू हे शहिद झाले. देशासाठी कर्तव्य बजावत असताना ते शहिद झाले या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने त्यांच्या कुटुंबास ५ कोटी रुपयांची मदत केली आहे.

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शहिद कर्नल संतोष बाबू यांच्या परिवारास भेट दिली व पूर्वीच्या आश्वासनानुसार आर्थिक मदत दिली. त्यांनी संतोष बाबूंच्या मुलांच्या नावे ४ कोटी रुपयांचा आणि आईच्या नावे १ कोटी रुपयांचा धनादेश त्यांच्या हाती दिला.

शहिद कर्नल संतोष बाबूच्या कुटुंबाच्या पाठीशी तेलंगणा सरकार सदैव उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी शोकग्रस्तांना दिली. तसेच त्यांनी हैदराबादच्या बंजारहिल्स भागात गृह-भूखंड मंजूर करण्याबाबतची गट -१ च्या पदासाठीचे भरती पत्र व कागदपत्रेही त्यांना दिली.

यापूर्वी त्यांनी कर्नल संतोष बाबू यांच्या तैलचित्रास श्रद्धांजली वाहिली. तेलंगणा राज्य सरकारने लेहमधील एलएसी येथे सर्वोच्च बलिदान देणा-या १९ सैनिकांनाही प्रत्येकी १० लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा