बारामती, दि.२२ जून २०२० : बारामती शहर पोलीस स्टेशन शहरात घरफोडी करणारे आरोपी जेरबंद केले आहेत. बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश भाजी मंडई संकुलातील गाळा नंबर एफ १०४ मध्ये अज्ञात चोरटयांनी दुकान फोडून त्यातील माल व रोख रक्कम चोरी करून नेले याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये दि.६ मे रोजी दुकानफोडीचा गुन्हा दाखल
करण्यात आला होता.
बारामती शहर पोलिसांनी चोरी झालेल्या गुन्ह्यातील मालाचा व अज्ञात आरोपींचा शोध बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने बारामती शहर व आसपासच्या गावामध्ये आरोपींचा शोध घेवून एका आरोपीस ताब्यात घेवून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता आरोपी तुषार मारूती सोनवणे वय (१९ वर्षे ) रा.बारामती आमराई कोअरहाऊस ता.बारामती जि.पुणे २) संग्राम साळुखे रा.बारामती आमराई वडकेनगर ता.बारामती जि.पुणे हा फरारी आहे. यांनी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यांचेकडून पोलिसांनी तपासादरम्यान २९,१००/-रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केले असून ते जप्त करण्यात आला आहे. हि कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर , पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर
पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले , योगेश शेलार, सहा. फौजदार संदिपान माळी, पो.कॉ. पोपट नाळे, राजेश
गायकवाड, सिध्देश पाटील, पोपट कोकाटे, सुहास लाटणे, अंकुश दळवी, दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी यांनी केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव