माढा (सोलापूर), दि. २३ जून २०२० : एमपीएससीने २०१९ च्या राज्यसेवा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला यामधे माढा तालुक्यातील लहान लहान गावतून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी यश मिळवत माढा तालुक्याला अधिका-यांचा तालुका अशी ओळख निर्माण करणारे यश संपादन केले आहे. मुख्यत्वे नितेश कदम उपशिक्षणाधिकारी – विठ्ठलवाडी, आदित्य शेंडे तहसीलदार – निमगाव टें, वर्षा कोळेकर ना.तहसीलदार – बादलेवाडी सोनाली भाजीभाकरे ना.तहसीलदार – कुर्डु अनुक्रमे अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व पदे आहेत. यावेळी भावी अधिका-यांचे संभाजी ब्रिगेड पुणे पदवीधर उमेदवार उद्यो. इंजि. मनोजकुमार गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
यावेळी चर्चे दरम्यान स्पर्धा परिक्षांची तयारी करताना येणा-या अडचणी समजून घेण्यात आल्या. सोनाली भाजी भाकरे यांनी पुणे येथे स्पर्धा परीक्षा तयारी करणा-या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने राहण्या व जेवणासाठी येणाऱ्या अडचणी मांडल्या. तसेच परीक्षा व निकाल यासाठी होणा-या दिरंगाई व अनिश्चिती मुळे येणारे मानसिक दडपण व तनाव याबाबत सर्वच विद्यार्थ्यांनी खंत व्यक्त केली. या अडचणी सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पुढील काळात योग्य ते प्रयत्न करण्यात येतील असे पदवीधर उमेदवार इंजि. मनोजकुमार गायकवाड यांनी नमुद केले.
संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत असताना या यशाबद्दल अभिनंदन करत आपणही समाजाच्या प्रगतीसाठी प्रमाणिक प्रयत्न करावेत व तसेच स्पर्धा परीक्षासाठी तयारी करणा-या गरजू विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करावे ही अपेक्षा या प्रसंगी व्यक्त केली.
या गुणगौरव सोहळयासाठी मराठा सेवा संघ माढा ता. अध्यक्ष दिनेश जगदाळे, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सुहास टोनपे, तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, ता. कार्यध्यक्ष सतिश चांदगुडे, दिपक जगताप, विकास शेंडे, राज टोनपे, इ. उपस्थीत होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील