जेजुरी कडेपठार मंदिरात निवडक लोकांच्या उपस्थितीत गणपूजा साजरी

पुरंदर, दि. २३ जून २०२० : तीर्थक्षेत्र जेजुरीतील जुनागड कडेपठार येथील खंडोबा मंदिरात आषाढ शुद्ध प्रतिपदेच्या निमित्ताने गणपूजा उत्सव साजरा करण्यात आला.
भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेवून मणी मल्ल दैत्यांच्या संहार केला तो हा अवतार दिवस असल्याने या दिवशी देव गणांनी त्यांची भांडाऱ्याने पूजा अर्चा केली. तेव्हापासून गणपूजा म्हणून या उत्सवाला ओळखले जाते.

रात्री नित्यनेमाची पूजा उरकल्यानंतर मानकरी सेवेकरी नित्य पूजाऱ्यांनी स्वयंभू लिंगावर भंडाऱ्याच्या राशी चढवल्या सुमारे सव्वा टन भंडाऱ्याची रास मार्तंड भैरवाच्या मूर्तीसमोर रचण्यात आली होती. त्यावर शिवलिंग साकारण्यात आले होते. संपूर्ण मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

या पुजे दरम्यान रात्रभर धार्मिक कार्यक्रम, सनईचा मंजुळ स्वरात निघालेला छबिना, वाघ्या मुरुळी लोककलावंतांची यांची हजेरी असते. मात्र कोरोना महामारीमुळे या सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता. काही मोजक्याच भाविक भक्तांच्या उपस्थतीत ही गणपूजा साजरी करण्यात आली. गर्दी होऊ नये, सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे म्हणून पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा