सोलापूर , दि. २३ जून २०२० : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन हा २३ जून रोजी साजरा केला जातो. १९४८ पासून ऑलम्पिक दिन साजरा करण्यात आला असला तरी ऑलिंपिकची सुरुवात खूप आधीपासून झालेली आहे. आज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन असल्यामुळे स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि डॉक्टर मेतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ही संस्था नावाप्रमाणेच खेळांशी संबंधित आहे. जागतिक स्तरावरील सर्व प्रकारच्या खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याचे काम ही संस्था करते. त्यात आज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन आहे त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सोलापूरातील डॉक्टर मेतन फाउंडेशन या संस्थेने आज राज्यस्तरीय वेबिनार आयोजित केले आहे.
हे वेबिनार सायंकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. या वेबिनार मध्ये विशेष वक्ते म्हणून नामदेव शिरगावकर, डॉक्टर जयप्रकाश दुबळे, प्रदीप गांधे, वीरधवल खाडे इत्यादी मान्यवर सहभागी होणार आहेत.
हे वेबिनार झूम क्लाऊड मीटिंगच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. या वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी संस्थेकडून मिटिंग आयडी देण्यात आला आहे. ३९३ १७९ ८६०० असा या वेबिनारचा मीटिंग आयडी आहे. यात सहभागी होण्यासाठी पासवर्ड ५५०२०८ असा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी