वाघोली, दि २३ जून २०२०: शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी
आज १००० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, यांना घोड धरणामध्ये ४०६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. घोड धरणाखालील नदी कोरडी पडलेली आहे. तरी घोड प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांची पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी प्राप्त झालेली आहे. सध्या डिंभे धरणात पाणीसाठा शिल्लक आहे.
घोड धरण लाभक्षेत्रातील ऊस व इतर पिके चांगली आलेली असून या पिकांना पाण्याची गरज भागविण्याकरिता डिंभे धरणातून उपयुक्त पाणी साठ्यातून १००० दशलक्ष घनफूट पाणी घोड धरणात सोडणेबाबत संबंधितांना आदेश व्हावेत यासाठी आमदार पवार यांनी मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे