पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय युवकाचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू

श्रीगोंदा, दि. २४ जून २०२० : श्रीगोंदा तालुक्याती म्हातार पिंपरी या गावा मध्ये २३ जून रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कमल विनायक शिर्के यांच्या शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खुशीद मखसुद शेख यांच्या फिर्यादी वरून श्रीगोंदा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

या बाबतीत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, उत्तर प्रदेश मधील सिन्नरपूर या गावातील मजूर कैलास पोपट शिर्के राहणार म्हातार पिंपरी तालुका श्रीगोंदा यांच्या गुरळावर कामास आलेले होते. आज दिनांक २३ जून रोजी त्यांची चार मुले बैसल सलिम शेख, नवाज सलिम शेख, हालिम सलिम शेख आणि आरबाज सलिम शेख, हे चौघेही आई वडिलांचा डोळा चुकवून कमल विनायक शिर्के यांच्या शेततळ्यात मध्ये पोहण्यासाठी गेले होते.

शेततळ्यात पोहत असताना तळ्यात ज्या पाईपच्या साहाय्याने तळ्यांत उतरले होते. अचानक तो पाईप तुटला त्यामुळे एक जण पाण्यात बुडू लागताच त्याला वाचवण्यासाठी इतरांनी ही प्रयत्न केला. परंतू पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने या चौघाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. या मुळे म्हातारा पिंपरी गावात शोककळा पसरली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा