उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाऊसाहेब कांचन यांची निवड

उरुळी कांचन, दि. २५ जून २०२०: उरुळी कांचन येथे आज दि.२४ जून २०२० रोजी ऊरळी कांचन तालुका हवेली ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाऊसाहेब कांचन यांची निवड करण्यात आली. या आधीचे उपसरपंच जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांनी राजीनामा दिल्याने सदरच्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच राजश्री जयंत वनारसे यांनी काम पाहिले व ग्राम विकास अधिकारी कैलास गोविंदा कोळी उपस्थित होते.

उपसरपंच पदाच्या जागेसाठी तीन अर्ज आले होते यावेळी निवडणूक घेण्यात आली त्यामध्ये भाऊसाहेब कांचन यांना ९ मते तर राजेंद्र जगताप ३, सारिका ताई मुरकुटे १ असे मतदान झाले. यावेळी माजी उपसरपंच जितेंद्र बाळासाहेब बडेकर व माजी सरपंच दत्तात्रय कांचन, सदस्य संतोष कांचन, सागर कांचन, सुनील कांचन, राष्ट्रवादी उरुळीकांचन शहर अध्यक्ष अर्जुन कांचन, उद्योगपती सुरेश रानवडे, उद्योगपती मयूर कांचन, अनिता बगाडे, आदी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी भाऊसाहेब कांचन यांचा सत्कार करण्यात आला व उरळीकांचन मध्ये आनंदाचे वातावरण होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा