डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थक उमेदवारांना अमेरीकी नागरिकांची ‘ ना ‘ पसंती

कॅरोलिन ,अमेरिका २५ जून २०२० : जगात कोरोनाचा थैमान असला तरी आमेरिकेत मात्र निवडणूकीचा रंग चढत चालला आहे.आमेरिकेचे नागरिक हे सध्या ट्रम्प यांना नापसंतीच्या दृष्टीने पाहत आहेत की काय? असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय.

नुकतेच उत्तर कॅरोलिनमध्ये सभागृह सदस्याची रिब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक पार पडली.ज्या मध्ये मतदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन दिलेल्या उमेदवारांचा पराभव केला.

उत्तर कॅरोलिनामधे ट्रम्प यांनी रिअल इस्टेट दलाल लिंडा बेनेट यांना पाठिंबा दिला होता.मात्र मतदारांनी २४ वर्षीय गुंतवणूकदार आणि अपघातात अपंग झालेले मेडिसन काॅर्थन यांच्या पारड्यात मते टाकली.तर केंटुकी येथेही ट्रम्प यांनी ज्यांना पक्षातून काढुन टाकण्याची मागणी केली होती,त्या थाॅमस मॅस्सी यांची निवड मतदारांनी करुन दिली.सहाव्यांदा नामांकन मिळालेल्या मॅस्सी यांनी ट्रम्प समर्थक टाॅड मॅक्मूर्ती यांचा पराभव केला आहे.

या सभागृह सदस्याच्या प्राथमिक निवडणूकीच्या रणधुमाळीतच ट्रम्प यांचे समर्थन आसलेल्या उमेदवारांचा हा पराभव म्हणजे पुढे खुद्द ट्रम्प यांनाही येणा-या निवडणुकीतला इशारा आहे असेच समाजावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा