हैदराबाद (तेलंगणा) २६ जून २०२० : – एका ३१ वर्षीय महिलेने तिच्या पतीनेे केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
आरजीआयए पोलिस स्टेशनचे पी विजय कुमार हे एका वृत्तसंस्थेशी फोनवर बोलताना म्हणाले की , “लावण्या गेल्या वर्षापर्यंत सॉफ्टवेअर कर्मचारी म्हणून काम करत होती, तिचा पती व्यंकटेश्वर राव पायलट आहे.त्यांच्या लग्नाला आठ वर्ष झाली होती ”.
मुले होऊ शकत नसल्यामुळे तीचा पतीे तीला सारखा मानसिक त्रास देत होता . त्यामुळेच तिने आत्महत्या केली. या प्रकरणी पती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी











































