कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजकार्याचे शतक

6

पुणे, दि. २६ जून २०२०: कोरोना महामारीच्या काळात गेले कित्येक दिवस लॉकडाउन चालू आहे. कोरोना वॉरियर्स हे दिवसरात्र आपली जबाबदारी पार पाडत देशाच्या सेवेत आहेत. अशा या गंभीर परिस्थितीमध्ये नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, मात्र ज्या ही वेळी समाजात अशा अडचणी येतात त्या त्या वेळी आपले समाजबांधव पुढे येऊन देशसेवेला हातभार लावतात. अशाच एका देशसेवेचे अतिशय उत्कृष्ट उदाहरण वंदे मातरम् संघटनेने समोर मांडले.

कोरोना महामारीच्या काळात वंदे मातरम् संघटनेने विद्यार्थी तसेच इतर संघटनांसोबत येऊन वेगवेगळे उपक्रम राबविले. गरजूंना मोफत अन्न वाटप, रक्तदान, ठिकठिकाणी जेवण व्यवस्था, कार्यरत असणाऱ्या कर्मचा-यांना चहा वाटप, धान्य वाटप, तोंडपट्टी वाटप, तसेच कोरोना सारख्या महामारी विरूद्ध लढण्यासाठी कोरोना विरूद्ध उपयुक्त अशा अर्सेनिक अल्ब ३० या गोळ्यांचे देखील मोफत वाटप केले.

अशा पद्धतीने लाखो फुड पॅकेट्स, वेळोवेळी गरजूंपर्यंत पोहोचून लागेल ती मदत करत वंदे मातरम् संघटनेने आज दिनांक २६ दिनांक रोजी या मदत कार्याचे एकूण १०० दिवस पूर्ण केले. पुणे अडचणी मध्ये असेल आणि पुणेकर मदतीला नाही येणार असे होवूच शकत नाही असे वंदे मातरम् संघटनेने साबीत केले.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा