लाहोर, २६ जून २०२० : सध्या कोरोना वायरसने संपुर्ण जगात थैमान घातले आहे अनेक देश या कोरोनाच्या प्रादुर्भावात आडकले आहेत. लाखो लोक कोरोनामुळे बाधित होवून मृत्यूमुखी पडले.
कोरोना हा एक संसर्ग बाधित विषाणू असून तो आपल्या संसर्गात येणा-या प्रत्येकाला बाधित करतो त्याच्यावर जगात अजून कुठले ही औषध उपलब्ध नाही. त्यामुळे तो अजून अाटोक्यात आलेला नाही.
या वायरसने सामान्य नागरिकांपासून राजकीय नेतपासून ते खेळाडूंपर्यंत सगळ्यांनाच आपल्या विळख्यात घेतले आहे.
काही दिवसापुर्वीच पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी हा कोरोना पॉझिटिव असल्याची बातमी आली होती, त्याला कॉरेंटाईन करून उपचार देखील सुरू केले होते. यात आता अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे की आफ्रिदी पाठोपाठ आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सात खेळाडूंची कोविड १९ चाचणी पॉझिटिव आली असून त्यांना कॉरेंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पाकिस्तानचे सात खेळाडू हे पुढील प्रमाणे फखर जमान, इम्रान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनन, मोहम्मद रिजवान आणि वहाब रियाज.
न्यूज अनकट प्रतिनिधी