ग्रामीण भागातील डॉक्टरांकडे डिग्रीच नाही

नवी दिल्ली, २७ जून २०२० : देशातील ग्रामीण भागात प्रत्येक तीन पैकी दोन डॉक्टरांच्या जवळ कायदेशीर डिग्री तर नाहीच पण ते लोकांवर योग्य ते उपचार करण्याच्या लायक पण नाहीत.
हि माहिती देशातील पब्लिक आणि प्राइवेट हेल्थ कॅर सिस्टम यांच्या एका संशोधानातून समोर आली आहे.

एका खाजगी वृत्तसंस्थेनुसार ग्रामीण भागात अंदाजे तीन आरोग्य कर्मचारी आहेत. पण यातील ८६% खाजगी डॉक्टर आहेत. त्यांच्यापैकी ६८% लोकांजवळ कोणतेही वैद्यकीय प्रशिक्षण नाही. हि माहिती १९ राज्यांतील १५१९ गावातून झालेल्या संशोधनातून पुढे आली आहे . हे संशोधन नवी दिल्ली सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चच्या संशोधकांनी केले आहे.

डब्ल्यूएचओच्या अहवालातही ही गोष्ट उघड झाली आहे.

सीपीआरच्या २०१६ च्या अहवाल मध्ये आलेल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन (डब्ल्यूएचओ) च्या अहवालाची बातमी या गोष्टींची पुष्टी करते. हेल्थ वर्कफोर्स ऑफ इंडियाच्या नावाने आलेल्या डब्ल्यूएचओच्या अहवालात दोन गोष्टीं समोर आल्या आहेत.

१. भारतमध्ये एलोपैथिक प्रॅक्टिस मधील ५७.३ % डॉक्टरांकडे वैद्यकीय शिक्षण नाही.

२. यामधील ३१.४ % लोकांचे शिक्षण हे फक्त शालेय स्तरावरील आहे.

तथापि यावरून आपण त्यांच्या गुणवत्तेविषयीचे मत बनवू शकत नाही.मात्र सीपीआरच्या अहवालात एका बातमीचा विशेष उल्लेख केला आहे .

“तथापि या प्रकरणात आपण हे म्हणू शकत नाही की शिक्षणाचा गुणवत्तेशी थेट संबंध आहे. कारण तमिलनाडु आणि कर्नाटकसारख्या अनेक राज्यांतील अनेक स्वास्थ्य कर्मचारी हे कमी प्रशिक्षण घेतलेले असून देखील युपी -बिहार च्या डॉक्टरांपेक्षा उत्तम काम करत आहेत . ”

एका अहवाल नुसार

१. ग्रामीण भागातील एकूण आरोग्य कर्मचा-यांंपैकी ६८% कर्मचारी हे कमी प्रशिक्षण मिळवलेले किंवा इनफॉर्मल आरोग्यकर्मी आहेत.

२. या मधील २४% आयुष डॉक्टर आहेत , वैकल्पिक पध्दतीने उपचार करण्यावर त्यांचा जोर असतो जसे की आयुर्वेद वगैरे.

३. फक्त ८% डॉ हे एमबीबीएस किंवा इतर स्तराच्या डिग्रीचे आहे.

अहवालात नमूद केले आहे की ग्रामीण भागातील लोक चांगल्या आरोग्य सेवेपासून खूपच दूर आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा