माढा : ता. 29 जून :रविवारी रात्री अकरा वाजल्या पासून मुसळधार कोसळत होता . रात्रभर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्यानंतर लाँकडाऊनमुळे जगाचा पोशिंदा बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला होता. जूनच्या पहिल्याच आठवड्यात कधी नव्हे ती वरुणराजाने हजेरी लावल्याने मोठ्या खर्चाने शेतकऱ्यांनी महागातले बियाणे विकत घेतले होते. तूर मूग मटकी बाजरी आदी रब्बी पिकांची पेरणी केली होती. मात्र अनेक कारणाने बियाणे कमी अधिक प्रमाणात उगवले. बियाणे निकृष्ट असल्याचे अनेक तक्रारी विविध ठिकाणाहून ऐकायला मिळत असतानाच उगवलेल्या पिकालाही नंतर पावसाची ओढ मिळाली.
पावसाने विश्रांती घेतल्याने उगवलेले पीक जळून जाऊन दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.या पावसाने रब्बी पिके हातात येणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. माढा शहरासह, मोडणींब शेटफळ,भुताष्टे, बेंबळे, टेंभुर्णी, शेवरे, माळेगाव, भिमानगर,रांजणी, उजणी, आलेगाव, सापटणे, चिंचोली, शिंदेवाडी, घोटी, परिते, जाधववाडी, वेताळवाडी,निमगाव,कुर्डू कुर्डवाडी,रोपळे या भागात मुसळधार पाऊस पडला.
न्यूज अनकट प्रतिनिधी