बारामती, दि. ३ जुलै २०२०: बारामती मध्ये लॉकडाऊनच्या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितिच्या व्यवहारांवर झालेल्या परिणामांचा अभ्यास करून माहिती घेण्यासाठी राज्य शासनाने अभ्यास समितीची स्थापन केली आहे. या समितीमार्फत राज्यातील बाजार समित्यांवर टाळेबंदीच्या काळात झालेले परिणाम यांचा अभ्यास केला जाणार आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांचाही या समितीमध्ये सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता देशात विशेषत: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.राज्याच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्त्वाचे योगदान आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणारे परिणाम व त्यावरील उपाययोजनांचा अभ्यास करून शासनाकडे अहवाल सादर करण्यासाठी ९ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या अभ्यास मंडळाची पहिली बैठक पुणे येथील पणन मंडळात संपन्न झाली.यावेळी बाजार समित्यांचे झालेले नुकसान व त्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव