वाडेबोलाई, दि. ३ जुलै २०२०: येथे काल दि. २ जूलै २०२० रोजी अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या पश्चिम महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी श्री. क्षेत्र वाडेबोलाई येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल काशिनाथ गावडे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सेवा समितीचे पश्चिम महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रल्हाद वारघडे यांनी सांगितले. अमोल गावडे यांनी या आधी अखिल भारतीय माहिती सेवा समितीच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी विराजमान असताना जिल्ह्यात उत्तम काम करून या समितीच्या माध्यमातून नागरिकांची विविध लोक उपयोगी कामे करून समाजामध्ये नागरिकांची विविध सार्वजनिक प्रश्न सोडविण्याचे प्रामुख्याने काम केले आहे.
जिल्ह्यात समितीच्या माध्यमातून गोर-गरीब गरजू नागरिकांना अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे. तर जिल्ह्यात समितीच्या माध्यमातून शिक्षण, धार्मिक, सामाजिक, क्षेत्रातही ते उत्तम काम करीत आहेत. वाडेबोलाई मध्ये विठ्ठल रुक्मिणीचे भव्य दिव्य मंदिर स्वतः अमोल गावडे यांनी स्वतः स्वखर्चातून बांधून उभारले असून त्यांनी श्री. विठ्ठल-रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे समाजकार्य सुरू आहे.
सद्यस्थितीत कोरोनाग्रस्त या ३ महिन्याच्या लॉकडाउन कालावधीत गावडे यांनी संकटात सापडलेल्या गरीब गरजू कुटुंबांना कोणतीही प्रसिद्धी न करता जिल्ह्यात विविध गावामध्ये धान्यरुपी व इतर माध्यमातून त्यांचे समाजकार्य सुरू आहे.
असा आदर्श कार्याचा ठसा त्यांनी या समितीच्या माध्यमातून जिल्हाभर असल्याने अमोल गावडे यांच्या आदर्श कामाची दखल अ. भा. माहिती सेवा समितीने घेऊन त्यांची समितीच्या पश्चिम महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.
या समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रल्हाद वारघडे, यांनी या निवडीचे पत्र गावडे यांना दिले आहे. तर अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेशजी एन. मनचेरियल यांनी व प्रल्हाद वारघडे यांनी गावडे यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांना पुढील आदर्श कामासाठी शुभेच्छा दिल्या व नवनियुक्त अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे पश्चिम महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अमोल गावडे यांचे अभिनंदन करून सामाजिक धार्मिक, राजकीय, शासकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या व्यक्तीकडून शुभेच्छा येत आहेत.
सेवा समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील असेन विविध क्षेत्रात होणाऱ्या भ्रष्टाचारास मी आळा घालणार आहे. तर समाज सेवा करण्यात आम्ही तत्पर आहे. तसेच आमचे अ. भारतीय माहिती सेवा समिती केंद्रीय संस्थापक अध्यक्ष सुरेशजी एन.मनचेरियल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद वारघडे सर यांच्या प्रेरणे नुसार सहकार्याने समिती उत्तम काम करणार आहे. असे “न्यूज अनकट” शी बोलताना अमोल गावडे अ. भा. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माहिती सेवा समिती उपअध्यक्ष यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे