लडाख, ३ जुलै २०२० : LAC वर चालू असलेल्या चीन बरोबरीच्या तणावाच्या पार्श्वभूमी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहाटे लडाख मधील नेमू या सैन्य फॉरवर्ड लोकेशन वर पोहचले.
मागील दिड महिन्यापासून चीन व भारत यांच्या मध्ये सीमा वादावरून व चीनच्या घुसखोरी वरून LAC वर बराच तणाव वाढला आहे. १५ जून रोजी झालेल्या वादामध्ये भारताचे CO मेजर सहित २० जवान शहिद झाले होते. त्यानंतर भारताने सीमेवर आपले सैन्य तर वाढवलेच होते पण त्याच बरोबर चिनुक, अपाचे, मिराज, मिग २००० सारखी युध्दात मदत होतील अशी हेलिकॉप्टर व युध्द विमाने देखील त्या भागात तैनात केली. तसेच भारताने आपली आर्टिलरी सुध्दा सीमेवर पोहचवली.
या संपूर्ण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काही दिवसापुर्वी सेना प्रमुख मुकुंद नरवणे हे देखील सीमेवर जावून आले. व त्यांनी तेथील परिस्थितीचा तपशील संरक्षण मंत्री व पंतप्रधान मोदी यांना दिला. त्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा विशेष ठरतो.
निमू लडाख येथे पोहचून मोदींनी सैन्य, हवाई दल व ITBP च्या जवानांशी संवाद साधला. ११००० फुट उंचीवर असलेले झांस्कर रेंज हे सिंधूच्या किना-या भोवती असणा-या कठीण भागापैकी एक आहे. याठिकाणी मोदींचे जाणे ही सैन्याचे मनोबल वाढवणारीच गोष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीने नक्की सैनिकांचे व संपूर्ण सैन्याचे मनोबल वाढणार,कारण इतक्या उंचीवर सामान्य व्यक्तीला श्वास घेण्यास ही त्रास होतो तेथे नरेंद्र मोदी यांनी जावून सैनिकांची भेट घेतली असल्याचे तेथील अधिका-याने सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी